जळगाव जिल्ह्यात यंदा निसर्गाचा लहरीपणा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या जळगावकरांना आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे.
मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी शहराचे तापमान ३२ अंशांपर्यंत पोहोचले असून, आगामी तीन ते चार दिवसांत हा पारा ३४ अंशांच्या पार जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे.
सध्या रात्रीचे तापमान १५ अंशांवर असून, ते लवकरच १८ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता रात्रीचा गारवा जवळपास गायब झाला आहे. काही प्रमाणात वारे वाहत असल्याने थोड्याफार प्रमाणात गारवा जाणवत आहे. पुढील आठवड्यापासून तापमानाचा पारा अधिक वाढणार असल्याने उन्हाचे चटके तीव्र होतील. अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे.
हवामानाचे महत्त्वाचे अपडेट्स असे...
फेब्रुवारीत उन्हाचा कडाका : साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस जाणवणारी उष्णता यंदा महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे.
पावसाची शक्यता : तापमान वाढीसोबतच पुढच्या आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
थंडीचा निरोप : जानेवारी महिन्यात थंडीचा जोर ओसरल्याने आता फेब्रुवारीत थंडी पूर्णपणे गायब झाली असल्याचे चित्र आहे.
आगामी पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज
| ४ फेब्रुवारी | ३३ अंश |
| ५ फेब्रुवारी | ३४ अंश |
| ६ फेब्रुवारी | ३३ अंश |
| ७ फेब्रुवारी | ३२ अंश |
| ८ फेब्रुवारी | ३३ अंश |
गेल्या पाच दिवसांतील तापमानाची स्थिती
| दिनांक | दिवसाचे तापमान |
| २ फेब्रुवारी | ३३ अंश |
| १ फेब्रुवारी | ३१ अंश |
| ३१ जानेवारी | ३० अंश |
| ३० जानेवारी | २८ अंश |
| २९ जानेवारी | ३० अंश |
Web Summary : Jalgaon experiences early heat waves in February after a cold winter. Temperatures are rising, with daytime highs reaching 32°C and expected to climb further. Night temperatures are also increasing, impacting daily life. A chance of rain is also predicted next week. This sudden climate change raises concerns about health issues.
Web Summary : जलगाँव में ठंडी सर्दी के बाद फरवरी में जल्दी गर्मी की लहरें महसूस हो रही हैं। तापमान बढ़ रहा है, दिन का तापमान 32°C तक पहुँच गया है और आगे बढ़ने की उम्मीद है। रात का तापमान भी बढ़ रहा है, जिसका असर दैनिक जीवन पर पड़ रहा है। अगले हफ्ते बारिश की भी संभावना है। इस अचानक जलवायु परिवर्तन से स्वास्थ्य संबंधी चिंताएँ बढ़ गई हैं।