lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > गुढीपाडव्याला जायकवाडी धरणात केवळ एवढं पाणी शिल्लक

गुढीपाडव्याला जायकवाडी धरणात केवळ एवढं पाणी शिल्लक

There is only so much water left in Jayakwadi Dam at Gudipadwa | गुढीपाडव्याला जायकवाडी धरणात केवळ एवढं पाणी शिल्लक

गुढीपाडव्याला जायकवाडी धरणात केवळ एवढं पाणी शिल्लक

मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज गुढीपाडव्यादिवशी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२.३६ ...

मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज गुढीपाडव्यादिवशी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२.३६ ...

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यातील शेकडो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज गुढीपाडव्यादिवशी १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ५२.३६ टक्के एवढा होता.

राज्यात तापमान वाढत असून धरणसाठा वेगाने खालावत आहे. सहा विभागातील मराठवाडा विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असून तोही १८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणात ३९१ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याला साधारण दोन महिने शिल्लक असताना नाथसागरातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. आज सकाळी ८.३० वाजता जायकवाडी धरणात १३ टीएमसी पाणी शिल्लक होते.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला. कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी घटली आहे. नदीसह बंधारे कोरडेठाक पडले. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या परळी थर्मलसाठी पाणी सोडण्यात आले आहे. थर्मलचे पाणी आटोपल्यानंतर ढालेगाव बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे; मात्र नेमके केव्हा पाणी येणार याबाबत जायकवाडी विभाग अनभिज्ञ असून एप्रिलच्या शेवटी पाणी दाखल होईल अशी शक्यता आहे.

Web Title: There is only so much water left in Jayakwadi Dam at Gudipadwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.