उत्तर भारतात या आठवड्यात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असून पर्वतीय प्रदेशांत मात्र पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने मांडली आहे. मात्र, उत्तरेतील अनेक राज्यांत तसेच दक्षिणेतील राज्यांत धुक्याचे साम्राज्य मात्र कायम राहणार आहे. पूर्व भारतात येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमान वाढू लागेल.
तर, पश्चिमेत महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागांतही तापमानात वाढ होणार आहे. ११ व १२ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर, गिलगिट, लडाख, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता असून हिमाचल व उत्तराखंडमध्ये हे प्रमाण थोडे अधिक असेल.
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार १० फेब्रुवारीला उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये दाट धुके राहील. हीच स्थिती दक्षिणेत तामिळनाडू, आंध्र किनारपट्टी भागात राहणार आहे.
याशिवाय बिहार, आसाम आणि मेघालयातही दोन दिवस काही प्रमाणात धुके राहील. दिल्लीकरांना दोन दिवसांपासून थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवू लागले आहे.
सकाळी व संध्याकाळच्या सुमारास मात्र बोचरी थंडी जाणवत आहे. दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे.
अधिक वाचा: केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना?
Web Summary : Maharashtra will experience relief from the cold this week, with rising temperatures. North India anticipates similar relief, but mountainous regions may see rain and snow. Fog persists in northern and southern states. The weather department forecasts light rain in Jammu & Kashmir, Himachal, and Uttarakhand around February 11-12.
Web Summary : महाराष्ट्र में इस सप्ताह ठंड से राहत मिलेगी, तापमान बढ़ने की संभावना है। उत्तर भारत में भी राहत की उम्मीद है, लेकिन पहाड़ी क्षेत्रों में बारिश और बर्फबारी हो सकती है। उत्तरी और दक्षिणी राज्यों में कोहरा छाया रहेगा। मौसम विभाग ने 11-12 फरवरी के आसपास जम्मू-कश्मीर, हिमाचल और उत्तराखंड में हल्की बारिश की भविष्यवाणी की है।