lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण

पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण

The last 12 months on Earth were the warmest on record | पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण

पृथ्वीवरील मागील १२ महिने आतापर्यंतचे सर्वात उष्ण

climate central या संस्थेचा अहवाल

climate central या संस्थेचा अहवाल

शेअर :

Join us
Join usNext

पृथ्वीवरील मागील १२ महिने हे आतापर्यंतचे सर्वात अधिक उष्णतेचे नोंदवले गेले आहेत. क्लायमेट सेंट्रल climate central या स्वयंसेवी संस्थेच्या विज्ञान संशोधकांच्या अहवालानुसार गॅसोलिन, कोळसा, नैसर्गिक वायू आणि कार्बनडाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे तसेच इतर जीवाश्म इंधन आणि इतर मानवी क्रीयाकलापांमुळे नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनैसर्गिक तापमानवाढ झाली.

वर्षभरात ७.३ अब्ज लोकांनी म्हणजे साधारण ९० टक्के लोकांनी किमान १० दिवस उच्च तापमान सहन केले, असे  हा अहवाल सांगतो. भारतातही अचानक उकाडा, चक्रीवादळे तसेच तापमान चढ, वाढणाऱ्या उष्णतेच्या लाटा, हवेतील  दमटपणा, अवेळी येणारा पाऊस याचे प्रमाण वाढते आहे.

प्राणघातकी वादळे

जेवढी अधिक उष्णता तेवढी वादळांची संख्या मोठी असे गणित. उष्णता अधिक असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रीयाही वेगाने होते. परिणामी विध्वंसक पाऊस आणि वादळे जास्त येतात. यावर्षी जगात अनेक प्रांतात अशी विध्वंसक व प्राणघातकी वादळे येऊन गेली.त्यातील आफ्रीकेतील डॅनियल वादळात ४००० ते ११ हजार लोकांचा जीव गेल्याचे सांगण्यात येते.

भारतातल्या ८६ टक्के लोकांनी अनुभवले उच्च तापमान

भारतात १.२ अब्ज लोक म्हणजेच साधारण ८६ टक्के लोकांनी तब्बल ३० दिवस उच्च तापमानाचा अनुभव घेतला. टोकाच्या हवामान बदलांमुळे किमान ३ पटींनी यात वाढ झाली आहे. ब्राझीलच्या ऍमेझॉनच्या प्रदेशात दुष्काळामुळे नद्या कोरड्याठाक पडल्या. कार्बन प्रदूषण पृथ्वीच्या वातावरणात उष्णतेच्या सापळ्यात अडकत असल्याने,  उन्हाळा अधिक उष्ण हाेत आहे. उन्हाळ्यातील तापमान वर्षाच्या सुरुवातीला येत आहे आणि धोकादायक उष्णतेचे प्रमाण  वारंवार वाढताना दिसत आहे.

Web Title: The last 12 months on Earth were the warmest on record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.