मुंबई: दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
महामुंबई परिसरातही सकाळी आल्हाददायक वातावरण राहील. मुंबईचे बुधवारी किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे निचांकी किमान तापमान आहे.
जळगावात तीव्र थंडीची लाट आहे. जळगावला ९.१ अंश तापमान नोंदवले असून सरासरीपेक्षा ६.२ अंशाने खाली आहे.
डहाणू, नाशिक, मालेगाव, बीड, यवतमाळ शहरांबरोबरच विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती.
नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देशमधील जिल्ह्यांत शनिवारपर्यंत थंडी जाणवेल.
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली परिसरात सोमवारपर्यंत किमान तापमान १८ ते २० अंश असेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
तर, महामुंबईत काही दिवस सकाळी आल्हाददायक वातावरण राहील, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
किमान तापमान (अंश सेल्सिअस)ठाणे - २२.४मुंबई - १८.६पालघर - १५.८नाशिक - १०.६मालेगाव - ११महाबळेश्वर - १२.५अहिल्यानगर - १२.६छ. संभाजी नगर - १३धाराशिव - १४.८सातारा - १५सांगली - १६.३सोलापूर - १७.१
अधिक वाचा: शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीसह १०० रुपये घेण्यात यश; शेतकऱ्यांना १२५ कोटींचा फायदा
Web Summary : Maharashtra faces colder nights as a cold wave hits neighboring states. Mumbai recorded a low of 18.6°C. Jalgaon shivers at 9.1°C. Nashik, Beed, Yavatmal, and Vidarbha also experience cold wave conditions. Relief expected in Mumbai, Navi Mumbai with temperatures around 18-20°C.
Web Summary : महाराष्ट्र में ठंड बढ़ने की आशंका, पड़ोसी राज्यों में शीतलहर का प्रकोप। मुंबई में न्यूनतम तापमान 18.6°C दर्ज। जलगांव में 9.1°C तक पारा गिरा। नासिक, बीड, यवतमाल और विदर्भ में भी शीतलहर का असर। मुंबई, नवी मुंबई में तापमान 18-20°C रहने की संभावना।