Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणार तापीचे पाणी; 'या' सिंचन योजनेला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:07 IST

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे.

तापी नदीचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवणाऱ्या या महाकाय प्रकल्पाचे काम आता ८५ ठक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, आगामी काळात खान्देशातील सुमारे १०० गावांचा कायापालट होणार आहे.

कामाची सद्यस्थिती : ८५% काम पूर्ण

जामफळ धरण : धरणाचे मुख्य काम पूर्ण झाले असून पाणी साठवण्यासाठी ते सज्ज आहे.

पंपगृह : दमाशी आणि लळिंग येथील उपसा केंद्रांचे (पंपहाऊन्स) काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.

पाईपलाईन : मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, आता वितरिकांचे जाळे विणण्याचे विणण्याचे जम काम सुरू आहे.

रेल्वे क्रॉसिंग : रेल्वे रुळांखालील पाईप पुशिगच्या तांत्रिक कामासाठी विशेष परवानगी मिळाली असून ते कामही प्रगतीपथावर आहे

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वर्षानुवर्षे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शिंदखेडा पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लाईफलाईन ठरणार आहे. या योजनेमुळे केवळ सिंचनच नव्हे, तर परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ होणार असल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही सुधारणा होईल.

बजेटमध्ये झाली होती मोठी वाढ

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी ५ हजार ३२९ कोटी ४६ लाख रुपयांच्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला हिरवा कंदील दाखवला आहे. सुरुवातीला कमी बजेट असलेल्या या योजनेचा खर्च वाढल्याने कामात काहीसे अडथळे आले होते, मात्र आता निधीचा प्रवाह सुरळीत झाल्याने ठेकेदार आणि जनसंपदा विभागाने कामाचा वेग वाढवला आहे.

काय आहे योजनेचे स्वरूप?

तापी नदीवरील सुलवारे बॅरेजमधून पावसाळ्यातील अतिरिका ९.२४ टीएससी पाणी उपसा करून ते जामफळ धरणात साठवले जाईल. तिथून हे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकन्यांच्या शेतापर्यंत पोहोचवले जाणार आहे.

लाभार्थी क्षेोष : ३३,३६७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार.

फायदा होणारी गावे : शिंदखेडा तालुक्यातील ५४ आणि धुळे तालुक्यातील २३ गावांसह परिसरार्ताज एकूण १०० गावांना लाभ.

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

English
हिंदी सारांश
Web Title : Tapi River Water to Benefit Drought-Prone North Maharashtra Talukas

Web Summary : The Sulwade-Jamfal-Kanoli irrigation project, utilizing Tapi river water, nears completion, promising transformation for 100 villages in Khandesh. With 85% of work done, including dam and pump house construction, the project will irrigate 33,367 hectares, improving water levels and benefiting farmers in Dhule and Shindkheda.
टॅग्स :तापी नदीजळगावधुळेपाणीनदीशेतीशेती क्षेत्रजलवाहतूक