Join us

Summer Weather Update : ह्यावर्षी फेब्रुवारीमध्येच उन्हाचा चटका कशामुळे? कसा राहील उन्हाळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:54 IST

सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलीच उष्णता वाढली आहे. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात खूप मोठी तफावत पाहायला मिळत आहे.

पुणे: सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलीच उष्णता वाढली आहे. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात खूप मोठी तफावत पाहायला मिळत आहे.

राज्यात शुक्रवारी (दि.२१) सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान जळगावात १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यातील तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने केला आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्यामधील उष्णता अतिशय असह्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, महाराष्ट्रावर वारा-वहनाच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झालेला नाही.

तो आहे तसाच टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकात तयार झाला.

पर्यायाने उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचलेच नाही. निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष म्हणजे अशी थंडी जाणवत नाही.

कमाल व किमान तापमान

शहरकमाल किमान
पुणे३५.२१४.९
नगर३४.२१८.३
जळगाव३४.४१२.०
महाबळेश्वर३१.०१७.४
रत्नागिरी३८.६२१.५
मुंबई३४.३२२.४

अधिक वाचा: पाटलांनी हळदीत केला विक्रम; ६० गुंठ्यांत घेतले ४५ क्विंटल हळदीचे उत्पादन

टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रजळगाव