lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > वाढती गरमी रोखण्यासाठी संशोधकांनी शोधून काढला हा मार्ग, काय आहे प्रयोग?

वाढती गरमी रोखण्यासाठी संशोधकांनी शोधून काढला हा मार्ग, काय आहे प्रयोग?

Researchers found this way to prevent the rising heat, what is the experiment? | वाढती गरमी रोखण्यासाठी संशोधकांनी शोधून काढला हा मार्ग, काय आहे प्रयोग?

वाढती गरमी रोखण्यासाठी संशोधकांनी शोधून काढला हा मार्ग, काय आहे प्रयोग?

गरमी रोखण्यासाठी हवेतील बाष्प कमी करण्याचा प्रयोग

गरमी रोखण्यासाठी हवेतील बाष्प कमी करण्याचा प्रयोग

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीचे वाढते तापमान ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याला न रोखल्यास भविष्यात मानवासह पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संशोधक अनेक प्रयोग करून तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अमेरिकेतील संशोधकांनी तापमान वाढ रोखण्याठी वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी केल्यास तापमान घटू शकेल, असा दावा केला आहे. वातावरणाच्या वरच्या भागात बर्फाचे कण सोडल्यास तापमानात घट होऊ शकते असा संशोधकांचा दावा आहे. नासा आणि नॅशनल ओशनिक अँड अॅॲटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनचे संशोधक यावर काम करीत आहेत.

वातावरणातील बाष्प वायू रूपातच असते. या बाप्पासोबत हरितगृह वायूही असतात, कोळसा आणि तेल यांच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साइड वातावरणात असतो. या सर्व घटकांमुळे सूर्याचा पृथ्वीपर्यंत पोहोचणारा प्रकाश अडवला जातो. संशोधकांची योजना आहे की वातारवणाच्या वरच्या थरातून बाष्पाचे प्रमाण कमी करण्यासाठी  तिथे बर्फाचे कण सोडले जावेत. त्यामुळे वातावरणातील उष्णता शोषून घेणयास मदत होईल.

संशोधकांचा नेमका प्लान काय आहे?

  • संशोधकांच्या पथकामध्ये सामील जोशुआ स्वार्त्म यांनी सांगितले की, अत्याधुनिक विमानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून १७ किलोमीटर इतक्या उंचीवर स्ट्रेटोस्फीअरच्या अगदी खाली बर्फाचे कण सोडले जातील. इथे निर्माण झालेली थंड हवा आणि बर्फ हळूहळू वरच्या दिशेने जातील जिथे बाष्पकण असतात. यामुळे बाष्पाचे रूपांतर बफति होईल आणि स्ट्रेटोस्फीअरचे तामपान कमी होईल.
     
  • प्रत्येक आठवड्याला दोन टन बफर्फाचे कण हवेत सोडले जातील. यामुळे त्या भागातील तापमान ५ अंशांनी घटू शकते. तापमानात फार घट झाली नाही तरी प्रदूषणाची पातळी मात्र नक्की कमी होईल.


प्रयोगातील धोके ओळखा अन्यथा...

  • काही संशोधकांच्या मते जिओ इंजिनीअरिंगच्या या पद्धतीने वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करता येणे शक्य नाही.
     
  • व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीचे संशोधक अँड्र्यू व्हिवर म्हणाले की, जलवायू परिवर्तनाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी वातावरणातील घटकांशी छेडछाड करणे योग्य नाही. यातून नवी संकटे निर्माण होऊ शकतात.

Web Title: Researchers found this way to prevent the rising heat, what is the experiment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.