Join us

पावसाचा पुन्हा एकदा 'कमबॅक'; मुसळधार पावसाच्या 'बॅटिंग'ने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:42 IST

बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे.

बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे.

यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी औरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्याही घटना घडल्या आहे.

शहरातील जुना पाणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहने काढण्यासाठी मोठी कसरत कराती लागत आहे. इतकेच नव्हे तर शहरातील काही खोलगट भागात असलेल्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणचे रस्ते पुरामुळे बंद झाले असून वाहतूक ठप्प इाली आहे.

पावसाने रान झाले ओलेचिंब, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, संततधार सुरुच...

पावसाने चांगलीच दडी मारली होती. वाढते उन्ह आणि वातावरणातील उकाड्याने जमीन कोरडी पडायला लागली होती. पावसाची गरज असल्याची चर्चा रोजच होत होती पण, पावसाचे वातावरण काही बनत नव्हते. पावसाचे चिन्ह नसतांना दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने रान ओलेचिंब होऊन गेले.

पिकांना पाणी मिळाले आणि वातावरणातील उमसपणा कमी झाल्याने शेतक-यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आभाळ काळेकुट्ट असल्याने दिवसभर राहणार असाही सूर लोकांमध्ये दिसत आहे. यावेळी शेतकन्यांसाठी हंगाम बरा दिसून येत आहे.

पाऊसही समाधानकारक असल्याने शेतातील सर्व कामे व्यवस्थित होताना दिसत आहे. २७ जुलैपासून पावसाने दही मारली होती. यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडचात तीन शिरखे झाले. त्यानंतर पाऊस झाला नसल्याने पिकांना पाटसाची नितांत गरज होती.

हेही वाचा : 'धामणगाव'चा सेंद्रिय शेतीचा गट करतोय वार्षिक दीड कोटींची उलाढाल; समूह शेतीतून विकास साधणाऱ्या गावाची वाचा कहाणी

टॅग्स :विदर्भपाऊसशेती क्षेत्रशेतकरीशेती