lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

Rain Alert: Cyclonic winds active over Maharashtra, warning of stormy rain with thunder in this area today | Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

Rain Alert: महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रीय, आज या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज

वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज

शेअर :

Join us
Join usNext

चक्राकार वाऱ्यांच्या विस्कळीत स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा चढाच असल्याचे पहायला मिळत आहे. काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ४३ अंशांच्या वर तापमान गेल्याची नोंद झाली. विदर्भातही  सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवले गेले. कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र तापमानाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील आठवडा आणखी तापणार!
.
राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमान  २ ते ३ अंशांनी वाढणार असून नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. 



आज कुठे कसे हवामान?

कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव,अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Rain Alert: Cyclonic winds active over Maharashtra, warning of stormy rain with thunder in this area today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.