Join us

Pune Weather : गांधीजयंतीपर्यंत पुण्यात किती पाऊस पडणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 20:55 IST

Pune Weather Updates : उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सर्वांत जास्त म्हणजे ६५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Pune Weather Updates : मागील एका आठवड्यापासून पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांमध्ये म्हणजे उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सर्वांत जास्त म्हणजे ६५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २९.४ ते ३२.० अंश सेल्सिअस तर कमान तापमान २९.४ ते २३.४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ९२ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २.५ ते ५.३ किमी होता.

पुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान राते ३१ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ०९ ते १९ किमी दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

पावसाचा अंदाज बघितला तर २८ सप्टेंबर रोजी ६५ मिमी, २९ सप्टेंबर रोजी १० मिमी, ३० सप्टेंबर रोजी ९ मिमी आणि १ व २ सप्टेंबर रोजी प्रत्येकी ५ मिमी एवढा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर उद्यानंतर पावसाचा जोर कमी होत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. तर पुढील सात ते दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात परतीच्या पावसाची शक्यता आहे. (Pune Latest Weather Updates)

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसपुणे