Join us

दिवाळी अगोदर अवकाळीची शक्यता; राज्यात 'या' १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:44 IST

Maharashtra Weather Update दरवर्षी मान्सून साधारणतः देशाभरातून १५ ऑक्टोबरदरम्यान बाहेर पडतो. एक-दोन दिवसांत देशाच्या उर्वरित ५ टक्के भूभागावरून मान्सून काढता पाय घेईल.

मुंबई : राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने गुरुवारी 'यलो अलर्ट'चा इशारा दिला आहे.

तर मुंबईत गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पावसाची शक्यता आहे. दरवर्षी मान्सून साधारणतः देशाभरातून १५ ऑक्टोबरदरम्यान बाहेर पडतो. एक-दोन दिवसांत देशाच्या उर्वरित ५ टक्के भूभागावरून मान्सून काढता पाय घेईल.

पावसाची शक्यता कधी आणि कुठे?गुरुवारीजळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.शुक्रवारीबुलढाणा, धुळे, नाशिक सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली.शनिवारसह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव.रविवारनाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली.

२० ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

अधिक वाचा: लागवडीखालील क्षेत्र व नुकसानीच्या आकडेवारीचा ताळमेळ बसेना; शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain Likely Before Diwali; Yellow Alert for 13 Districts

Web Summary : Maharashtra faces unseasonal rain. The weather department issued a yellow alert for 13 districts, including Raigad, Ratnagiri, and Pune. Mumbai may experience rain Thursday through Saturday. Cloudy weather and light rain are expected across Maharashtra until October 20th.
टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रमुंबईमोसमी पाऊस