मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. दरम्यान २ सप्टेंबरनंतर नुकसानीचा अधिकृत आकडा समोर येईल, असेही सूत्रांनी सांगितले.
पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली असून १५५ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत विभागात ४७९४ मिमी पाऊस झाला असून, तो वार्षिक सरासरीच्या १११ टक्के इतका आहे. जून, जुलैमध्ये २८५ मिमी पाऊस झाला. विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे संपर्क तुटल्याने पंचनाम्यांत अडचण येत आहे. महिनाअखेरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होणार होते. मात्र, आता त्याला विलंब लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
२६०० गावांना पावसाचा फटका
• २९ ऑगस्टच्या सकाळपर्यंत विभागातील १३० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.
• २६०० गावांना या पावसाचा फटका बसला. त्या गावांतील खरीप पिकांचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
३१ ऑगस्टपर्यंत किती पाऊस?
• मराठवाड्यात ३१ ऑगस्टपर्यंत ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ८५ टक्के हे प्रमाण आहे. पावसाळ्याचा सप्टेंबर हा शेवटचा महिना असतो.
• पुढील ३० दिवसांत सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यास खरीप पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्टच्या सकाळपर्यंत विभागात ४.१ मि.मी. पाऊस झाला.
• साधारणपणे दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडतोय.