Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 08:46 IST

Monsoon Update 2025 यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या १७ वर्षातील म्हणजेच २००८ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे.

नवी दिल्ली : यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या १७ वर्षातील म्हणजेच २००८ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे.

सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचला आहे.

नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. १५ किंवा १६ मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.

त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

पुढील २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. १४ मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.

मान्सून कुठे आणि केव्हा येण्याची शक्यता१५ मे : अंदमान आणि निकोबार.१ जून : केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय.५ जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.६ जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.१० जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार.१५ जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश.२० जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली.२५ जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश.३० जून : राजस्थान, नवी दिल्ली.

अधिक वाचा: यंदाच्या खरीपात सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी टॉप १० जाती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजमहाराष्ट्रपाऊसकेरळहवामान अंदाज