Join us

Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता, पुढील ३-४ दिवसात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 2:35 PM

शेतकऱ्यांनी कशी घ्यावी पिकांची काळजी? जाणून घ्या..

मराठवाड्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण राहणा आहे. ७ मे पासून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊन त्यानंतर तापमान घटण्याची शक्यता आहे.

दिनांक 04 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात, दिनांक 05 मे रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तापमानात वाढ होऊन तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 08 ते 14 मे 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे

दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करावीत.

टॅग्स :पाऊसमराठवाडाहवामान