Join us

Marathawada Water Issue: मराठवाड्यात मुबलक जलसाठा असूनही शेकडो गावे तहानलेलीच; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:56 IST

Marathawada Water Issue: मराठवाड्यात मागीलवर्षी चांगला पाऊसमान झाल्याने पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. परंतु आता प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे. काय आहे याचे कारण ते जाणून घ्या सविस्तर (Marathawada Water Issue)

श्रीनिवास भोसले

छत्रपती संभाजीनगर विभागातील ४४ मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांत सध्या एकूण ४१.७२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, हा साठा वर्षीच्या १५.०९ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल २५ टक्क्यांनी अधिक आहे.(Marathawada Water Issue)

यंदा मराठवाड्याला दिलासा मिळाला असून, बहुतांश गावांची तहान भागत आहे. मात्र, नियोजनअभावी शेकडो गावांना टँकरचा आधार अन् डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.(Marathawada Water Issue)

जायकवाडी प्रकल्पात ४३.७१ टक्के, आपेगाव बंधारा ४७.५७ टक्के, तर बीडमधील मांजरा प्रकल्पात ४२.७१ टक्के जलसाठा आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण ४२.३२ टक्के आणि येलदरी धरणात ५७.१८ टक्के साठा असून, नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात ३१.८७ टक्के पाणी उपलब्ध आहे. धाराशिव जिल्ह्यात निम्न तेरणा प्रकल्पात सर्वाधिक ५५.४९ टक्के जलसाठा असून, लातूर जिल्ह्यात नागझरी बंधाऱ्यात सर्वाधिक ६१.४९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

या जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, काही गावांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व नियोजनाअभावी पाणीटंचाई जाणवत आहे. नांदेड जिल्ह्यात आजघडीला १४ टँकर सुरू झाले असून, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात नांदेडपेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा (आकडे टक्केवारीत)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील

आपेगाव४७.५७

बीड जिल्ह्यातील

डोंगरगाव३८.०२
माजलगाव१८.८५,
मांजरा३३.२०,
रोशनपुरी बंधारा६.५१,
वांगदरी बंधारा३३.३३,

नांदेड जिल्ह्यातील आमदुरा

ढालेगाव३०.९६,
दिगडी४३.९७,
दिग्रस१९.९५,
हिरडपुरी१०.५३,
जोगलादेवी२३.४०,
लोणीसावंगी१३.१४,
निम्न मानार४६.९०,
मंगरूळ११.६०,
मुदगल बंधारा५६.०७

धाराशिव जिल्ह्यात नऊ प्रकल्प असून,

औराद बंधारा३१.६१
गुंजारगा८.७६,
किल्लारी२७.६९,
लिंबाळा६.९०,
मदनसुरी५.१७,
राजेगाव५.०८,
सिना कोळेगाव३.६०,

लातूर जिल्ह्यातील ९ प्रकल्पांपैकी नागझरी बंधाऱ्यात सर्वाधिक ६१.४९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

तसेच भुसानी३८.२६,
बिंडगिहाळ बंधाऱ्यात२.२२,
कारसा पोहरेगाव४९.२७,
फुलगापूर२२.१२,
साई३२.८५,
शिवण२०.७८,
टाकळगाव देवरा७.१०,
वांझरखेडा बंधारा४६.३९,

तर निम्न दुधनामध्ये ३६.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

हे ही वाचा सविस्तर: Turmeric Breeding Seed: राज्यात पहिल्यांदाच हळदीचे पैदासकार बियाणे 'या' केंद्रात उपलब्ध; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडापाणीधरणहिंगोलीबीडनांदेड