लातूर येथील मांजरा (Manjara Dam) प्रकल्पात सद्यः स्थितीत ६६.३२ दलघमी जिवंत पाणीसाठा असून मागीलवर्षीच्या तुलनेत कितीतरी पटीने पाणी अधिक आहे. त्यामुळे यंदा शेतीच्या पाण्याचीही सोय झाली आहे. (Summer Crops)
उन्हाळी पिकासाठी (Summer Crops) आतापर्यंत पहिली फेरी झाली असून दुसरी फेरी सुरू आहे. या दोन फेऱ्यांमध्ये ३४ दलघमी पाणी शेतीला दिले आहे. एका दलघमीला १२० हेक्टर जमीन भिजणे अपेक्षित आहे. त्यानुसार ५१ दलघमीतून ६१२० हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. (Manjara Dam)
मांजरा प्रकल्पामध्ये (Manjara Dam) गेल्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे रब्बी पिकालाही पाणी सोडण्यात आले होते. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी १२ दलघमी पाणी देण्यात आले होते. आता उन्हाळी पिकासाठी पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. (Summer Crops)
मे महिन्यात तिसरे रोटेशन...
मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून दुसरी फेरी पाण्याची शेतीसाठी सुरू आहे. आता तिसरी फेरी मे महिन्यामध्ये सुरू होईल. तिसऱ्या फेरीत पाणी शेतीला सोडले जाणार आहे.
३७ प्रकल्पात ६६.३२ दलघमी...
सद्यः स्थितीत मांजरा प्रकल्पात ६६.३२२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मागील वर्षी या तारखेमध्ये फक्त ९.४०९ दलघमी जिवंत पाणी होते. यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंचन आणि पिण्याला कमरता भासरणार नाही. मांजरा प्रकल्पामध्ये सद्यः स्थितीत ३७.४८ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. मागीलवर्षी या तारखेत ५.३२ टक्के पाणीसाठा होता. त्यावर पावसाळा येईपर्यंत लातूर शहरासह विविध गावांचा पाणीपुरवठा होता. यंदा मात्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रब्बी, उन्हाळी पिकांना वरदान ठरले आहे.
अठरा हजार हेक्टर सिंचन क्षेत्र क्षमता...
मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा फाट्यापर्यंत आहे. धनेगावपासून लातूर आणि रेणापूर तालुक्यापर्यंतचे क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली आलेले आहे.
रोटेशननुसार सोडले पाणी
पहिल्या फेरीत उजव्या कालव्यातून ८ आणि डाव्या कालव्यातून ९ असे १७ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. सद्यः स्थितीत दुसरी फेरी सुरू असून, दुसऱ्या फेरीतही १७ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. याचे २० दिवस रोटेशन सुरु राहणार आहे. उजव्या कालव्यातून १२ एप्रिल आणि डाव्या कालव्यातून १५ एप्रिलपर्यंत पाण्याचे रोटेशन होते.