Join us

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचे आगमन कुठे झाली सगळ्यात कमी तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:18 IST

दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे.

दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे.

गुरुवारी सांगली येथे कमी तापमानाची नोंद झाली. तेथे गुरुवारी तिथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अहिल्यानगर येथे त्या खालोखाल १४.७ अंश सेल्सिअस तापमान होते.

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील तापमानामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यात थंडी पडली नाही; पण पावसाचे वातावरण होते.

दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील पाच दिवस राज्यामध्ये कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील किमान तापमानाची नोंदसांगली - १४.४अहिल्यानगर - १४.७पुणे - १५.२जळगाव - १५.८महाबळेश्वर - १५.६मालेगाव - १७.८सातारा - १६.६परभणी - १८.३नागपूर - १८.६​​​​मुंबईची हवाही गरमच ■ वाढत्या तापमानामुळे मुंबईची हवाही निवडणुकीत उष्णच राहणार आहे. १५ नोव्हेंबरनंतर मात्र किमान तापमानात घट होईल आणि महिनाअखेरीस मुंबईकरांना थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज आहे. ■ किमान तापमान २२, तर कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास असेल. पहाटे वातावरण आल्हाददायक असेल, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रमुंबईसांगली