Join us

Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:46 IST

मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे.

रविवार ते मंगळवार मुंबई महानगर प्रदेशात तापमान चढे नोंदविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला होता.

कुठे किती पारा?पुणे : ३६.०सोलापूर : ३८.२सांगली : ३७.९रत्नागिरी : ३७.५मुंबई : ३७.४कोल्हापूर : ३७.१सातारा : ३६.२धाराशिव : ३६.१

पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ होत आहे. ६ ते १२ मार्चदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई व कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. मुंबईचा पाराही ३९ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवार ते मंगळवार दरम्यान उन्हाचा तडाखा जास्त असू शकेल. - अश्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

अधिक वाचा: 'एक राज्य, एक नोंदणी' उपक्रमात चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने घेतला हा नवा निर्णय

टॅग्स :हवामान अंदाजतापमानसोलापूरमुंबईपुणे