Join us

Maharashtra Weather Update : परभणीकर अनुभवताय हुडहुडी ; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:06 IST

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे. IMD रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहेत. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मराठवाडा आणि विदर्भात तापमानात घट झाली आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री कमालीची थंडी जाणवत आहे. मात्र, दिवसा काही भागात ढगाळ हवामान आहे तर काही भागात कोरडे हवामान आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. आता पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील तापमानामध्ये झपाट्याने मोठी घट होत आहे.पुढच्या आठवड्यामध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मराठवाड्यातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सर्वात कमी तापमान हे परभणीत नोंदवण्यात आले. परभणीत पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (२१ नोव्हेंबर) रोजी कमाल तापमान २० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. परभणीमध्ये आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. जालना, बीड आणि धराशिव या जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यात देखील किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे असणार असून तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

मुंबईत आजचे किमान तापमान २४ अंश सेल्सिअस (अंश सेल्सिअस) नोंदवले गेले आहे आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस (अंश सेल्सिअस) पर्यंत जाण्याचा अंदाज आहे .दिवसभर, तापमान  ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुण्यात आजचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे आणि कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. नागपुरात आजचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे आणि कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दिवसभर, तापमान २६ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची आणि फळबागांची काळजी घ्यावी. येत्या काही दिवसात तापमानात अजून घट होणार आहे. विशेष करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकाची योग्य ती काळजी घ्यावी.

* शेतकऱ्यांनी कापूस पिकांची काढणी करुन घ्यावी तसेच कापसाला सूर्यप्रकाशात वळवून घ्यावे.

* पक्व झालेल्या सिताफळाची काढणी करुन बाजारात प्रतवारीसाठी पाठवावे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपरभणीऔरंगाबादनागपूर