Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्यात हवामान खात्याने दिला थंडीच्या लाटेचा इशारा; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:32 IST

राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे.

पुणे: राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे.

राज्यामध्ये मंगळवारी सर्वांत कमी किमान तापमान जळगावात ८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर त्यानंतर नाशिकला ९.४ अंशांवर तापमान होते. सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच वाढले आहेत.

परिणामी राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली गेला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (दि. १०) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होत थंडी आणखी असल्याचा वर्तविण्यात आला.

वाढणार अंदाज उत्तर, मध्य, पश्चिम भारत अधिक (महाराष्ट्रासह) थंडीमध्ये गारठण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारत (विशेषतः तामिळनाडू, तटीय आंध्रप्रदेश, रायलसीमा) येथे अतिवृष्टीचा अनुभव होण्याची शक्यता आहे.

राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

राज्यातील किमान तापमानपुणे : १२.३नगर : ११.७जळगाव : ८०नाशिक : ९.४मुंबई : २०.८अकोला : ११.८नागपूर : १२.०

बंगालच्या उपसागरातून दक्षिणेच्या मार्गे येणाऱ्या सध्याच्या प्रणालीचा पावसावर फारसा प्रभाव दिसणार नाही. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये १२-१४ डिसेंबरदरम्यान अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. १३ डिसेंबरपासून रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रमध्य प्रदेशआंध्र प्रदेश