Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात IMD चा अंदाज काय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 09:56 IST

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक उष्णतेचा ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात (IMD forecast) आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक उष्णतेचा ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात (IMD forecast) आहे.

आता हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असून अंगाची लाही लाही होणार आहे. (IMD forecast)

अशातच महाराष्ट्रातील काही भागात उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाचा मार्च अधिक तापदायक उष्ण ठरण्याची चिन्ह दिसत आहे. (IMD forecast)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्चिम-उत्तर भारतात आज (२मार्च) पासून पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. 

विशेषत: ४ मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.

मार्चमध्ये कसे असेल तापमान?

कालपासून मार्च महिन्यास सुरुवात झाली असून डॉ. के. एस. होसाळीकर (माजी प्रमुख, IMD पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील काही भागात २-३ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण, गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. 

* कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे डाळींब व चिकू बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. बागेतील फुटवे काढावेत, असा सल्ला देण्यात आला.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमुंबईकोकणमहाराष्ट्र