Join us

Maharashtra Weather Update : राज्यात पोळ्यापर्यंत 'या' भागात पुन्हा अतिवृष्टीची इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 09:07 IST

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात २१ ऑगस्टपर्यंत पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून १७ ते १६ जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधला, यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

नांदेड विभागात २०६ मिमी इतका ढगफुटीसदृश पाऊस झाला असून तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफसह आता सैन्यदलाला देखील पाचारण केले आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ६ नंतरच्या सहा तासात १७० मिमी पाऊस झाला.

मुंबईत मंगळवारी चार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. ज्या भागात रेड अलर्ट आहे, तेथील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

१९ ऑगस्टला कुठे काय?मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात अंरिंज अलर्ट देण्यात आला आहे.

नुकसान भरपाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाघरांचे नुकसान, माणसे, पशुधनाचे मृत्यू याबाबत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे, तसेच तेथील लोकांना जेवण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अधिक वाचा: Pik Nuksan Bharpai : मे महिन्यातील पीक नुकसानीचे ४० कोटी आले; लवकरच बँक खात्यावर जमा होणार

टॅग्स :हवामान अंदाजशेतीपाऊसपीकनांदेडमराठवाडाजिल्हाधिकारीदेवेंद्र फडणवीस