Join us

Maharashtra Weather Update : कडक उन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:30 IST

फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता 'ब्रेक' घेतला आहे. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली.

फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता 'ब्रेक' घेतला आहे. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली.

पुढील दोन दिवसातील काही काळ ढगाळ वातावरण असणार असून, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे तेथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा थोडासा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येऊ शकतो. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ फेब्रुवारी रोजी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि शुष्क राहील.

पुढील दोन दिवसानंतर तापमान हळूहळू वाढेल. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव अधिक राहणार असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलांवर सतत लक्ष ठेवावे.

हलक्या पावसाच्या शक्यतेमुळे काही भागांना दिलासा मिळू शकतो. मात्र त्याचा मोठा प्रभाव राज्यभर जाणवणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चार दिवसातील कमाल व किमान तापमानदिनांक : कमाल : किमान२३ फेब्रुवारी : ३७.९ : १९.९२२ फेब्रुवारी : ३८.० : २१.६२१ फेब्रुवारी : ३७.६ : २२.०२० फेब्रुवारी : ३८.१ : २०.२२

अधिक वाचा: Namo Shetkari Hapta : नमो शेतकरीच्या ६ व्या हप्त्याचा निर्णय झाला; हप्ता मिळणार का? वाचा सविस्तर

टॅग्स :हवामानतापमानपाऊसमहाराष्ट्र