Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update: सावधान ! पश्चिम बंगालच्या उपसागरात येणार चक्रीवादळ; वाचा IMD चा आजचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:50 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाची (cyclone) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाची  (cyclone) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचा परिमाण हवामानावर होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात थंडी तर काही जिल्ह्यात तापमान वाढलेले असल्याचे चित्र आहे.

राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असून काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढला आहे.  याचा परिमाण राज्यावरील हवामानावर होणार असल्याचेही हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे आज (दि.११)  कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढण्याची शक्यता आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. पहाटे, संध्याकाळी व रात्री च्या वेळी गारठा वाढला आहे. मुंबई, ठाणे परिसरातही गारठा जाणवत आहे. मात्र, दुपार नंतर उकाडा जाणवत आहे.  दरम्यान, पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यामुळे दिवसभर उष्णता व रात्री थंडी असे वातावरण राज्यात अनुभवायला मिळणार आहे.

राज्यात पुण्यासह काही जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. यात सांगली, नाशिक, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तापमानात २ ते ४ अंश डिग्री सेल्सियसने घट झाली असून गारठा वाढला आहे. 

पुणे आणि घट परिसरात पारा खाली

पुण्यात कोरडे वातावरण असून गारठा वाढला आहे. सकाळी धुके पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसानंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे.

कोकणात तापमान उष्ण

कोकणात तापमान वाढलेले आहे. सकाळी थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीसाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून या ठिकाणी कमाल तापमान हे ३५.९ अंशांवर गेले आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तापमान वाढले आहे. शहरी भागांमध्ये हवेत धुक्याचे प्रमाण वाढणार आहे.

मराठवाड्यात कोरडे हवामान 

मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात येत्या चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

शेतकरी सल्ला 

• संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

• रब्बी हंगामात भाजीपाला पिकाचे गादी वाफे व लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे,  असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :हवामानमहाराष्ट्रमोसमी पाऊसपाऊसविधानसभा हिवाळी अधिवेशनशेतीशेती क्षेत्र