Join us

Maharashtra Rain Updates : कोकण अन् पश्चिम घाटात जोरदार पाऊस; या २ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 09:01 IST

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाची संततधार सुरू आहे. पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसामध्ये काही काळ खंड असणे गरजेचे आहे.

Maharashtra Rain Updates : राज्यात सर्वदूर मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या असून पीकविम्यासाठीही अर्ज केले आहेत. काही पिकांच्या वाढीसाठी आणि आंतरमशागतीसाठी आता पावसामध्ये खंड अपेक्षित आहे. पण राज्यातील चारही विभागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, आज राज्यातील पश्चिम घाट, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

राज्यातील सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, पालघर, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

आज कुठे आहेत अलर्ट?पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरी