Join us

Maharashtra Rain Updates : मुसळधार पावसानंतर राज्यभरात पावसाचा जोर ओसरला! पुढील ५ दिवस कसे असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 22:09 IST

Maharashtra Rain Updates : पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून पाझर तलाव आणि छोटी धरणे भरले आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. 

Maharashtra Rain Updates : राज्यात मागच्य काही दिवासांपासून चांगला पाऊस पडत आहे. तर तीन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून पाझर तलाव आणि छोटी धरणे भरले आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. 

दरम्यान, अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी पश्चिम घाटासह महाराष्ट्रात झालेल्या पावसानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. २५ जुलैनंतर राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे चित्र आहे.

पुढील पाच दिवसांच्या पर्जन्यमानाचा विचार केला तर कोकण, पश्चिम घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ जुलै ते १ ऑगस्ट या काळामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमीच आहे. 

संपूर्ण मराठवाड्यात अजूनही म्हणावा तितका पाऊस झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पाझर तलावही भरले नसल्यामुळे पावसाचे असमान वितरण होत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान,राज्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पश्चिम घाटातील भात लागवड अजूनही बाकी आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी एक रूपयांत पीक विमा या योजनेसाठी अर्ज भरला आहे. 

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरी