Join us

महाबळेश्वरच्या पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला; कोयना धरणात झाला किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:06 IST

Koyna Dam Water Level सातारा शहरात पावसाची उघडझाप असून, पश्चिम भागात जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने साठा वाढत आहे.

सातारा : सातारा शहरात पावसाची उघडझाप असून, पश्चिम भागात जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने साठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धरणात ५६ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात कोयनानगरमध्ये ५८ मिलिमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५९ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

कोयना धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण पाणीसाठा ५६.०३ टीएमसी झालेला असून, पाणीसाठ्याची टक्केवारी ५३.२४ इतकी आहे.

२४ तासांत धरणात सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. नदी विमोचक द्वारमधूनही विसर्ग केला आहे.

अधिक वाचा: सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :कोयना धरणपाणीपाऊसधरणमहाबळेश्वर गिरीस्थान