Water Storage : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने यंदा तब्बल २२२ कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात यश मिळवले असून, त्यामुळे सुमारे ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामासाठी सिंचनक्षम झाले आहे. (Water Storage)
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण ग्रामीण भागात रब्बी हंगामासाठी पाण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.(Water Storage)
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने यंदा रब्बी हंगामापूर्वी केलेल्या प्रभावी नियोजनाची प्रत्यक्ष फलश्रुती दिसू लागली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील एकूण २३९ कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यांपैकी तब्बल २२२ बंधाऱ्यांमध्ये जलसाठा अडविण्यात यश आले आहे. या जलसाठ्यामुळे ग्रामीण भागातील सुमारे ६,४२० हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामात पुरेसे सिंचन उपलब्ध होणार आहे.(Water Storage)
पावसाळ्यातील अनियमित पर्जन्यमान, शेतकऱ्यांची वाढती चिंता आणि रब्बी हंगामाची सुरुवात यामुळे सिंचनाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशीष येरेकर, झेडपी सीईओ संजिता महापात्र आणि अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण विभागाने यंदाच्या साठवण बंधाऱ्यांचे काम वेगाने पूर्ण केले.(Water Storage)
२२२ बंधाऱ्यांत जलसाठा उपलब्ध
रब्बी हंगामातील गहू, चना, हरभरा, ज्वारी, भाजीपाला आणि बागायती पिकांना सिंचनाची साथ मिळणार
कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये अडविलेल्या पाण्यामुळे भूजलपातळी वाढण्यासही मदत
अनेक गावांना पर्यायी सिंचनस्त्रोत उपलब्ध
पालकमंत्री वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात यंदा २२२ बंधाऱ्यांत जलसाठा झाला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात याचा लाभ घ्यावा.- सुनील जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी
तालुकानिहाय कोल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या व जलसाठा स्थिती
| तालुका | साठवण बंधारे (संख्या) |
|---|---|
| भातकुली | ३ |
| तिवसा | १४ |
| अमरावती | १३ |
| चांदुर बाजार | १३ |
| अचलपूर | १६ |
| अंजनगाव सुर्जी | ८ |
| दर्यापूर | १ |
| चांदुर रेल्वे | १५ |
| नांदगाव खंडेश्वर | १२ |
| धामणगाव रेल्वे | २ |
| चिखलदरा | ३७ |
| धारणी | ४० |
| मोर्शी | १६ |
| वरुड | ३९ |
या तालुक्यांत बहुतेक बंधाऱ्यांमध्ये आवश्यक एवढा जलसाठा उपलब्ध असून सिंचनासाठी योग्य प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्व
* पिकांमध्ये पाण्याचा ताण येणार नाही
* सिंचनासाठी डिझेल/वीज खर्चात बचत
* रब्बी पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता
* बागायती क्षेत्रालाही स्थैर्य मिळणार
अमरावती जिल्ह्यातील कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यांत अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे यावर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक सक्षम ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि जलसंधारण विभागाची जलद अंमलबजावणी यामुळे ६,४२० हेक्टर क्षेत्राला वेळेवर आणि पुरेसे सिंचन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : हमी खरेदी केंद्रांवर माल नाही! ओलावा ठरतोय सर्वात मोठा अडथळा
Web Summary : Amravati successfully stored water in 222 Kolhapuri bandharas, irrigating 6,420 hectares for the rabi season. This achievement, driven by effective planning, ensures water availability for key crops like wheat and chickpeas, benefiting farmers and boosting agricultural stability.
Web Summary : अमरावती में 222 कोल्हापुरी बांधों में जल का सफल भंडारण, रबी मौसम के लिए 6,420 हेक्टेयर भूमि की सिंचाई। प्रभावी योजना से गेहूं, चना जैसी फसलों के लिए पानी सुनिश्चित, किसानों को लाभ।