Join us

Vidarbha Weather Update : गडचिरोली ‘ओले’, अमरावती ‘कोरडे’;विदर्भात पावसाचे विषम चित्र वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:33 IST

Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचं चित्र अगदी विषम आहे. गडचिरोली, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांनी हंगामी पावसाची मर्यादा ओलांडली असली, तरी उर्वरित जिल्ह्यांत अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा सुरूच आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी तग धरत आहेत, तर काही भागात अतिवृष्टीचा फटका बसलाय. वाचा सविस्तर (Vidarbha Weather Update)

Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचं चित्र अगदी विषम आहे. गडचिरोली, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांनी हंगामी पावसाची मर्यादा ओलांडली असली, तरी उर्वरित जिल्ह्यांत अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा सुरूच आहे. (Vidarbha Weather Update)

काही ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी तग धरत आहेत, तर काही भागात अतिवृष्टीचा फटका बसलाय. हवामान खात्याने मात्र पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Vidarbha Weather Update)

यंदाचा पावसाळा विदर्भासाठी तितकासा समाधानकारक नाही. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, फक्त वाशिम, नागपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांनी हंगामी सरासरी पावसाची मर्यादा ओलांडली आहे.  (Vidarbha Weather Update)

बाकीच्या जिल्ह्यांत अजूनही  पावसाची प्रतीक्षा सुरू असून, धरणसाठ्यातील कमतरतेमुळे खरीप हंगामाची चिंता वाढली आहे. (Vidarbha Weather Update)

यंदाचा पावसाळा विदर्भात सुरुवातीला उशिरा सुरू झाला आणि पहिल्या काही आठवड्यांत पावसाची स्थिती कमकुवत राहिली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला, पण ऑगस्टच्या सुरुवातीपासून पुन्हा वेग मंदावला.

यंदाचा पाऊस

जिल्हापाऊस (टक्केवारीत)
बुलढाणा८९.६ %
अकोला७९.३ %
वाशिम१०३.२ %
अमरावती६६.९ %
यवतमाळ९३.० %
वर्धा९०.६ %
नागपूर१००.४ %
भंडारा९३.८ %
गोंदिया९५.७ %
चंद्रपूर९६.७ %
गडचिरोली११३.४ %

गतवर्षीपेक्षा घट

गेल्यावर्षीच्या तुलनेत विदर्भातील अमरावती विभागात 115.9% आणि नागपूर विभागात तब्बल 129.1% पाऊस झाला होता. 

यंदा मात्र सर्व जिल्ह्यांत पावसाची टक्केवारी कमी झाली आहे.

धरणसाठ्यात तुटवडा

समान प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक सिंचन प्रकल्प अद्याप 100 टक्के क्षमतेपर्यंत भरलेले नाहीत. खरीप हंगामातील कापूस, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची चिंता

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांतील पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी निर्णायक ठरणार आहे. 

हवामान विभागाने (IMD) विदर्भात पुढील आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : श्रावणसऱ्यांपेक्षाही जास्त मुसळधार पाऊस; ऑरेंज-यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसविदर्भगडचिरोलीअमरावती