Join us

Vidarbha Weather Update : विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; 'या' दिवशी परतीचा हंगाम सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:00 IST

Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update)

Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update)

८ ऑक्टोबरनंतर पाऊस कमी होईल, तर परतीचा सामान्य पाऊस १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे.(Vidarbha Weather Update)

विदर्भातील पावसाची प्रणाली सध्या सक्रिय असून पुढील तीन दिवसांपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. (Vidarbha Weather Update)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), ८ ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होईल, तर १५ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक द्रोणीय रेषा सध्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरापासून पूर्व विदर्भ, पश्चिम झारखंड, दक्षिण बिहार, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावरून जात आहे. या प्रणालीमुळे विदर्भात गेल्या २४ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

शनिवारी (४ ऑक्टोबर) सकाळी ८:३० वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, कापंटी येथे २.३ सेंमी, कोरपणा येथे २.२ सेंमी, हिंगणा येथे १.२ सेंमी, मौदा येथे १ सेंमी, आणि वर्धा येथे ०.८ सेंमी पाऊस पडला आहे.

आज (५ ऑक्टोबर )रोजी, विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील पावसाचे प्रमाण ८ ऑक्टोबरपासून घटू लागेल, आणि १५ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाचा कालावधी सुरू होईल. -डॉ. प्रवीण कुमार, हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Weather: Rain Expected with Thunder; Monsoon Retreat Starts Soon

Web Summary : Vidarbha will experience rain with thunderstorms for three days. Rainfall intensity decreases after October 8th; monsoon retreat begins around October 15th. Nagpur's weather center indicates a trough line causing scattered rainfall. Light to moderate showers are expected with thunderstorms in some areas.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजविदर्भपाऊस