Vidarbha Monsoon Update : जमीन ओली, अवकाशात ढगांची चाहूल... शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी, खरी प्रश्न एकच. पेरणीचा योग्य मुहूर्त कधी? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही विदर्भातील शेतकरी आजही नक्षत्रांवर (Mrig Nakshatra) अधिक विश्वास ठेवतात. (Vidarbha Monsoon Update)
मृग नक्षत्राचा (Mrig Nakshatra) उदय आणि कोल्ह्याचे वाहन यामुळे यंदा भरघोस पावसाची आशा निर्माण झाली असून, परंपरेच्या पायावर आधुनिक शेतीचे निर्णय घेतले जात आहेत. (Vidarbha Monsoon Update)
मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे जमिनी ओली झाली असून, शेती मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्ष पेरणीसाठी शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, नक्षत्रांवर आधारित परंपरागत गणितांनुसार पेरणीचा योग्य मुहूर्त शोधला जात आहे. (Mrig Nakshatra)
यावर्षी ७ जूनपासून सुरू होणाऱ्या 'मृग नक्षत्र' (Mrig Nakshatra) पासून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
परंपरा आणि अनुभवाचा मिलाफ
सध्या यांत्रिकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगातही राज्यातील अनेक भागातील शेतकरी नक्षत्रांवर आधारित शेतीच्या परंपरेवर आजही विश्वास ठेवतात. नक्षत्र हे केवळ खगोलशास्त्रीय संकेत नसून, त्याचा थेट संबंध हवामान, जमिनीतील ओलावा आणि बी-बियाण्यांच्या उगमावर असल्याने अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे.
मृग नक्षत्राचे वाहन 'कोल्हा' असल्यामुळे यंदा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे नक्षत्र पेरणीसाठी आदर्श मानले आहे.
अशाप्रकारे आहेत यावर्षीची नक्षत्रे व वाहनांची यादी
दिनांक | नक्षत्र | वाहन |
७ जून | मृग | कोल्हा |
२२ जून | आर्द्रा | उंदीर |
५ जुलै | पुनर्वसू | घोडा |
१९ जुलै | पुष्य | मोर |
२ ऑगस्ट | आश्लेषा | गाढव |
१६ ऑगस्ट | मघा | बेडूक |
३० ऑगस्ट | पूर्वा | म्हैस |
१३ सप्टेंबर | उत्तरा | कोल्हा |
२७ सप्टेंबर | हस्त | मोर |
१० ऑक्टोबर | चित्रा | हत्ती |
२४ ऑक्टोबर | स्वाती | बेडूक |
कृषी विभागाचा सल्ला
यंदा विदर्भात मान्सूनने सुरुवात केली असली तरी, पावसात खंड पडल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा अद्याप तयार नाही. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना १० जूननंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणीसाठी किमान ७ इंच जमिनीतील ओलावा आणि १०० मिमी इतका पाऊस झालेला असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड
शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान, हवामान ॲप्स, सेंद्रिय उपाय, यांत्रिकी साधनांचा वापर वाढत असला तरी, शेतकरी अजूनही नक्षत्रांवर आधारित पारंपरिक ज्ञानावर विश्वास ठेवतो. यावर्षीही मृग नक्षत्रात पेरणी करणार असल्याचे चित्र आहे, परंतु कृषी विभागाचा सतर्कतेचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा ठरतो.
मृग नक्षत्र हे यंदाच्या खरीप हंगामासाठी महत्त्वाचे ठरणार असून, त्यात भरघोस पावसाची शक्यता असल्याने परंपरेनुसार आणि आधुनिक अंदाजांच्या आधारावर पेरणीचा निर्णय शेतकरी घेतील.
शेतकरी काय सांगतात
मी कृषी विभागाच्या सूचनांनुसार आणि मोबाईल ॲपवरील अंदाजावरूनच पेरणी करणार आहे. नक्षत्र महत्त्वाची आहेत, पण अचूक हवामान माहितीही तितकीच आवश्यक आहे. - सारंग रिंगोले, शेतकरी, चिंचाळा
आमच्या आजोबा-पणजोबांपासून आम्ही नक्षत्रांवरच शेती करतो. यंदाही मृग नक्षत्रातच पेरणी करणार आहे. पाऊस चांगला होईल असा विश्वास आहे. - विठ्ठल महारतळे, शेतकरी, नरसाळा