Vidarbha Monsoon Update : सध्याच्या हवामान स्थितीचा आढावा घेतल्यास विदर्भवासीयांना पावसाची अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भात मान्सूनची तारीख दिलेली आहे. (Vidarbha Monsoon Update)
महाराष्ट्रात दक्षिण भागात मान्सूनने अधिकृतपणे हजेरी लावली असली तरी विदर्भ मात्र, अजूनही पावसाच्या प्रतिक्षा करावी लागणार आहे. गडचिरोलीच्या काही भागांत मान्सून पोहोचला असला तरी तो पुढे सरकताना दिसत नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Vidarbha Monsoon Update)
महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असली तरी विदर्भ अजूनही उष्णतेचा तडाखा (Heat wave) जाणवत आहे. गडचिरोलीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी संपूर्ण विदर्भ पावसाच्या प्रतिक्षेत आहे. (Vidarbha Monsoon Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, १२ जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, तोपर्यंत उकाड्याचा कहर (Heat wave ) वाढणार आहे. तापमानाचा पारा आता ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून शेतकऱ्यांनी पेरणीस थांबावे, असा महत्त्वाचा सल्लाही हवामान विभागाने दिलाय. (Vidarbha Monsoon Update)
तापमानात झपाट्याने वाढ
मान्सून रखडल्यामुळे उत्तरेकडून गरम वारे वाहत असून याचा परिणाम तापमानावर झालाय. काही भागांत तापमान थेट ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असून उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसाचा अंदाज कधी?
हवामान खात्याने(IMD) दिलेल्या माहितीनुसार, १२ जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे. मात्र, तो सामान्य स्वरूपाचा असणार असून काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सून रखडण्यामागील कारणे
* बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून पुरक वातावरणाची कमतरता
* उत्तरेकडून गरम वाऱ्यांचा प्रभाव
* विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल हवामान तयार न होणे
शेतकऱ्यांसाठी सल्ला
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीस घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. मान्सूनची वाट पहावी, हवामानाच्या अपडेटवर लक्ष ठेवावे, असे आवाहन नागपूरच्या क्षेत्रीय हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे.