Join us

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून प्रचंड विसर्ग; किती धरण भरले ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:58 IST

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam)

Upper Wardha Dam : अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू असून, परिसरात नेत्रदीपक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. (Upper Wardha Dam)

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली असून, सर्व १३ वक्रद्वार उघडून ८४४ घनमीटर प्रति सेकंद पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. (Upper Wardha Dam)

अप्पर वर्धा धरण परिसरात रविवारी दिवसभर निसर्गाचा नेत्रदीपक देखावा अनुभवायला मिळाला. धरणाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता प्रशासनाने सर्व १३ वक्रद्वार ४० सेंटीमीटरने उघडली.(Upper Wardha Dam)

त्यातून तब्बल ८४४ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला. सलग २२ तास हे दरवाजे उघडे राहिल्याने नदीपात्रात प्रचंड प्रवाह निर्माण झाला आणि धरण परिसरात पर्यटकांची गर्दी उसळली. (Upper Wardha Dam)

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा परिणाम

मध्य प्रदेशातील जाम नदी व सालबर्डी येथून येणारी माडू नदी तुडुंब भरून वाहत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धरणाची पातळी ३४२.३७ मीटर इतकी झाली होती, जी जवळपास ९८% क्षमतेइतकी आहे. निर्धारित जलपातळी ३४२.५० मीटर इतकी असल्याने पाण्याचा विसर्ग अपरिहार्य ठरला.

पावसाचा फटका शेतकऱ्यांना

दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरात शनिवारी मुसळधार पावसाने शेतात पाणी साचले. कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

मागील दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी असल्याने शेतकरी चिंतित आहेत.स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील भागात जाण्याचे टाळावे, तसेच सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Dam Water Update : राज्यातील धरणे टक्केवारीत अव्वल; कुठे किती पाणीसाठा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीवर्धा नदीअमरावतीशेतकरीशेती