Join us

Rain Alert : नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस कायम, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:20 IST

Rain Alert : तर पुढील चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Nashik Rain Alert :  मागील चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) दाणादाण उडवून दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik Rain Alert) अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे. तर पुढील चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात १६ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik District Rain) तसेच घाट क्षेत्रात काही ठिकाणी आजपासून १३ व १६ मे २०२५ रोजी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

तसेच दि. १४ व १५ मे २०२५ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. १७ मे २०२५ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नाशिक जिल्ह्यासाठी प्रभावा आधारित अंदाज कृषी सल्ला

  • शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना मेघगर्जनेसह विजांपासून पासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
  • दि. १३ ते १६ मे २०२५ दरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट, पाऊस तसेच सोसाट्याचा वान्याचा अंदाज
  • सक्ष्यात घेता पशुधनाला / दुभत्या जनावरांना गोठपात ठेवा आणि विजेपासून स्वतःचे संरक्षण करा. जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने भाजीपाला व फळपिकांना काठीचा आधार द्यावा.
  • पावसाची शक्यता असल्याने भाजीपाला व काढणीस आलेले फत्रा पिके त्वरित काढणी करून प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे.
  • पशुधन: मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता दुभत्या जनावरांना गोठ्यात ठेवा. 
  • गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवा आणि त्यांना विजांपासून वाचवण्यासाठी प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
  • मेघगर्जनेसह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे. 
  • दुभत्या जनावरांना गोठ्यामध्ये ठेवा.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषि हवामान विभागमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :पाऊसनाशिकशेती क्षेत्रशेतीहवामान अंदाज