Maharashtra Dam Storage : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी अधून मधून पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. आज 23 जुलै पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे हे पाहुयात.
काही प्रमुख धरणांचा पाणीसाठा पाहिला तर यामध्ये जायकवाडी धरणामध्ये उपयुक्त जलसाठा ७८.३४ टक्के, उजनी धरणात ९४.७४ टक्के, कोयना धरणात ७१.१५ टक्के, गंगापूर धरण ६१.८७ टक्के, गिरणा धरण ५५.९६ टक्के, भंडारदरा धरण ७६.४६ टक्के, निळवंडे धरण ८७.१८ टक्के असा प्रमुख धरणातील जलसाठा आहे.
विभागनिहाय जलसाठा पाहिला तर नाशिक विभागातील दारणा धरण ८२.६१ टक्के, पालखेड धरण ५१ टक्के, हातनुर धरण ३३ टक्के, अनेर धरण २९.४१ टक्के, पांझरा धरण १०० टक्के भरले आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आढळा, विसापूर, सीना ही तीन धरणे शंभर टक्के भरली असून भोजापुर ९१.६९ टक्के, डिंभे धरण ७७.१९ टक्के भरले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील धरणांमध्ये मोडक सागर ९९.९९ टक्के, तानसा ९८.६१ टक्के, मध्य वैतरणा धरण ९४.२५ टक्के भरले आहे. तसेच कोकण विभागातील धरणांमध्ये भातसा धरण ८८.४७ टक्के, अप्पर वैतरणा ९४.१० टक्के, मोराबे धरण ६७.३३ टक्के, पुणे विभागातील चासकमान धरण ८३.४७ टक्के, पानशेत धरण ८०.८० टक्के, खडकवासला धरण ५३.१२ टक्के, मुळशी धरण ७८.०७ टक्के भरले आहे
तसेच राधानगरी धरण ९२.५९ टक्के, अलमट्टी धरण ७६.९१ टक्के, मराठवाड्यातील काही धरणांपैकी येलदरी धरण ६१.०५ टक्के, माजलगाव धरण १२.४७ टक्के आहे. तेरणा धरण ६८.९२ टक्के, मांजरा धरण ८४.७३ टक्के, गोसीखुर्द धरण १८.९७ टक्के, खडकपूर्णा धरण १४.२५ टक्के, काटेपूर्णा धरण ३६.६१ टक्के असा जलसाठा आहे.
- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर,जलसंपदा (से.नि), संगमनेर.