Join us

Weather Report : महाराष्ट्रात दिवसा अन् रात्रीही उष्णतेची काहिली, कसं असेल तापमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 19:03 IST

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री सध्या उकाडा जाणवत आहे.

उद्या गुरुवार दि.२८ ते रविवार ३१ मार्च दरम्यानच्या चार दिवसा (रंगपंचमी व नाथषट्ठी) पैकी फक्त शनिवारी दि.३० मार्चला एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, असे वाटते. सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ डिग्री से. ग्रेड च्या श्रेणीत जाणवत असुन ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.               सध्याची उष्णता, दुपारच्या कमाल तापमानाच्या ९५ व्या टक्केवारीत स्पष्ट करतांना असे म्हणावे लागेल कि २५ मार्च नंतरच्या येणाऱ्या पाच दिवसात म्हणजे २५ ते ३० मार्च पर्यन्त मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेंच मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा काही जिल्ह्यातील कमाल तापमान नोंदणाऱ्या एकूण सर्व केंद्रापैकी ९५ टक्के केंद्रावर दुपारचे निम्न पातळीतील कमाल तापमान ४० डिग्री से. ग्रेड जाणवेल तर केवळ उर्वरित ५% केंद्रावर मात्र भाग बदलत निम्न पातळीतील ४० डिग्री से. ग्रेड कमाल तापमानपेक्षा अधिक दुपारचे कमाल तापमान (म्हणजे ४१, ४२ डिग्री से. ग्रेड) जाणवेल.                तसेच रात्री चा असह्य उकाडाही या परिसरात अधिक जाणवणार असुन तो तसाच ३० मार्चपर्यंत जाणवेल. त्यामुळे भले उष्णतेच्या लाटेची कसोटी जरी परिपूर्ण होत नसली तरी महाराष्ट्रातील ह्या भागात दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री सध्या उकाडा जाणवत आहे. ते असेच पुढेही दि.३० मार्चपर्यंत जाणवेल, असे वाटते.. 

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ 

टॅग्स :शेतीनाशिकहवामानमुंबईउष्माघात