Join us

Siddheshwar Dam Water : ‘सिद्धेश्वर’चे सहा गेट उघडले; पूर्णा नदीपात्रात वाढला विसर्ग! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:11 IST

Siddheshwar Dam Water : सिद्धेश्वर धरण आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या भागातील पावसाचा वेग मंदावला असला तरी येलदरीमार्गे सतत पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरण प्रशासनाने सहा गेट एक फुटाने उघडले आहेत. यामुळे पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Siddheshwar Dam Water)

Siddheshwar Dam Water : सिद्धेश्वर धरण आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या भागातील पावसाचा वेग मंदावला असला तरी येलदरीमार्गे सतत पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरण प्रशासनाने सहा गेट एक फुटाने उघडले आहेत. (Siddheshwar Dam Water)

यामुळे पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिद्धेश्वर धरण परिसरातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरण प्रशासनाने २४ ऑगस्टपासून केवळ सहा गेट एक फुटाने उघडून विसर्ग सुरू ठेवला आहे. (Siddheshwar Dam Water)

या गेटमधून सध्या ४९३५ क्युसेक पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता खालीद सय्यद यांनी दिली.(Siddheshwar Dam Water)

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आठ दिवसांपूर्वी धरणातील पाण्याचा जलप्रवाह वाढल्यामुळे १२ गेट तब्बल तीन फुटांनी उघडून विसर्ग करण्यात आला होता. मात्र, सध्या पाण्याचा येवा कमी झाल्याने त्यातील सहा गेट बंद करण्यात आले आहेत.(Siddheshwar Dam Water)

येलदरीतून सिद्धेश्वरकडे पाण्याचा पुरवठा

धरणाच्या वरच्या भागात सध्या पाऊस नसला तरी खडकपूर्णा धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह येलदरीमार्गे सिद्धेश्वर धरणात येत आहे. येलदरी धरणाचे दोन गेट अर्ध्या फुटाने उघडले असून, ४ हजार २२० क्युसेक पाणी सिद्धेश्वरात सोडले जात आहे.

जलसाठ्याची सद्यस्थिती

सिद्धेश्वर धरण सध्या ९९.२२ टक्के क्षमतेने भरलेले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण प्रशासन विसर्ग नियंत्रित ठेवत आहे.

धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Discharge: जायकवाडीतून विसर्गाचा लाभ; पैठण ते नांदेडपर्यंत सर्व बंधारे भरले

टॅग्स :शेती क्षेत्रधरणहिंगोलीपाणीशेतकरीशेती