Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः या पावसाची शक्यता मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात अधिक जाणवते.
तारीख-वार नुसार जिल्हनिहाय पावसाची शक्यता खालीलप्रमाणे-
२४ ऑक्टोबर - बीड, धाराशिव, लातूर उत्तर, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
२५ ऑक्टोबर - नाशिक, जळगांव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर.
२६ ऑक्टोबर - मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छ संभाजी नगर, नांदेड.
२७ ऑक्टोबर - धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छ संभाजी नगर.
२८ ऑक्टोबर - पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड.
कशामुळे पावसाची शक्यता? आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्यला ५७० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात ह्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता जाणवते.
आग्नेय बंगालच्या उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे उद्या मध्य बं. उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.
Web Summary : Maharashtra is likely to experience moderate rainfall with thunderstorms for the next five days, except for North Vidarbha. Mumbai, Pune, and other districts face increased chances of rain due to low-pressure areas in the Arabian Sea and Bay of Bengal. Meteorologist Manikrao Khule provides the forecast.
Web Summary : उत्तर विदर्भ को छोड़कर महाराष्ट्र में अगले पांच दिनों तक गरज के साथ मध्यम बारिश होने की संभावना है। अरब सागर और बंगाल की खाड़ी में कम दबाव के क्षेत्रों के कारण मुंबई, पुणे और अन्य जिलों में बारिश की संभावना बढ़ गई है। मौसम विज्ञानी माणिकराव खुळे ने पूर्वानुमान दिया है।