Join us

Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत केवळ 23 टक्के पाणीसाठा, वाचा कुठे किती पाणी शिल्लक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:28 PM

नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र असून दिवसेंदिवस पाणी पातळी घटत चालली आहे.

राज्यात सर्वदूर वाढत्या तापमानाबरोबरच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भात मात्र अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र असून दिवसेंदिवस पाणी पातळी घटत चालली आहे. जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 23. 89 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी हाच जलसाठा 40 टक्क्यांवर होता. 

यंदाचा उन्हाळा कडक असून नाशिकचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानाने जलस्रोत आटत चालले आहेत. पिके पाण्याअभावी सुकत चालली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर यंदा धरणांची पाणीपातळी देखील चिंताजनक असल्याचे चित्र आहे. आजमितीला जिल्ह्यातील धरणांत 23. 89 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा असून अद्यापही उन्हाळ्याचे 36 दिवस शिल्लक असताना पाणीटंचाईने कहर केला आहे. 

असा आहे धरणसाठा 

जिल्ह्यातील धरण साठा पाहायला गेलं तर गंगापूर धरणात 41.63 टक्के, कश्यपी 33 टक्के, गौतमी गोदावरी 28 टक्के, पालखेड 33 टक्के, ओझरखेड 01 टक्के, पुणेगाव शून्य टक्के, दारणा 23 टक्के, भावली 12 टक्के, मुकणे 28 टक्के, वालदेवी 39 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 26 टक्के, चणकापुर 19 टक्के, हरणबारी 37 टक्के, केळझर 16 टक्के, गिरणा 22 टक्के तर माणिकपुंज 05 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 23 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :हवामानशेतीपाऊसपाणी टंचाईनाशिकगंगापूर धरण