Monsoon Rain Update : मान्सूनची (Monsoon) आगेकूच कायम असुन आज दक्षिण कोकणातील वेंगुर्ला सावंतवाडीहून २४ तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड काबीज करत मुंबईत तर सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर काबीज करत पुण्यात पोहोचला आहे.
आज या परिसरात मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) दमदार हजेरी लावली आहे. नाशिक, अहिल्यानगर, छ.सं.नगर या भागात अजुन पोहोचवयाचा असुन मान्सूनच्या वाटचालीस वातावरण अनुकूल आहे.
आज व उद्याचा पाऊस -
मान्सून आज व उद्या (२६, २७ ला, सोमवार मंगळवारी) मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री लगतच्या घाट क्षेत्रात मान्सून चा तर भाग बदलत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वळीव स्वरूपाचा अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
दोन दिवसानंतरचा पाऊस-
बुधवार दि. २८ ते शनिवार दि. ३१ मे दरम्यानच्या ४ दिवसात खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
विदर्भातील पाऊस -
विदर्भात मात्र आज सहित पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि. ३१ मेपर्यंत मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.
कालचा पाऊस -
काल रविवारी (२५ ला) महाराष्ट्रात से. मी.मध्ये झालेला जोरदार पावसाची ठिकाणे हर्णाई-३१, कुलाबा १४, रत्नागिरी ११, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ९, अकोला बुलढाणा २, वर्धा ४ सेमी.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.