Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवार (२८ ऑगस्ट) रोजी दिवसभर आणि रात्री सतत पडलेल्या पावसाचा तडाखा १३० मंडळांत येणाऱ्या २,६०० गावांना बसला. (Marathwada Rain Update)
सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले.(Marathwada Rain Update)
छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. वार्षिक सरासरी ६७९ मि.मी.च्या तुलनेत विभागात आतापर्यंत ५७३ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे, म्हणजेच सरासरीच्या अंदाजाच्या ८४ टक्के इतका पाऊस झाला आहे.(Marathwada Rain Update)
गुरुवारी (२८ ऑगस्ट) विभागात एकूण ६० मि.मी. पाऊस पडला. यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस असून, यात लातूर जिल्ह्यात २१ मि.मी. तर नांदेड जिल्ह्यात १३२ मि.मी. रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.(Marathwada Rain Update)
नांदेड शहरात शिरलेल्या पावसाच्या पाण्याने शेकडो दुकाने व घरांचे नुकसान झाले. बुधवार २७ ऑगस्ट रोजी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर गुरुवारी १३० मंडळांना पावसाने धुतले.(Marathwada Rain Update)
नांदेड जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक १३२.७ मि.मी. पाऊस झाला, जे सरासरीच्या तुलनेत १९० टक्के इतके आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४, बीडमधील १६, लातूरमधील ३६, धाराशिवमधील १, नांदेडातील ६९, परभणीतील १ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडळांत ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला.(Marathwada Rain Update)
हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ३० ऑगस्टपासून थोडा ब्रेक मिळेल, परंतु गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुरुवारी जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण आणि अतिवृष्टी प्रभावित मंडळ व गावांची संख्या
जिल्हा | पाऊस (मि.मी.) | अतिवृष्टी मंडळ | प्रभावित गावं |
---|---|---|---|
छ. संभाजीनगर | २९.९ | ४ | ८० |
जालना | १३.१ | – | – |
बीड | ४८.४ | १६ | ३२० |
लातूर | ९१.८ | ३६ | ७२० |
धाराशिव | १६.१ | १ | २० |
नांदेड | १३२.७ | ६९ | १३८० |
परभणी | ३८.४ | १ | ६० |
हिंगोली | १९.९ | ३ | – |
एकूण | ६०.०० | १३० | २६०० |