Join us
Daily Top 2Weekly Top 5

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडीसह ११ मोठ्या धरणांनी गाठली धोक्याची पातळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:21 IST

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून मागील आठ दिवसांत तब्बल २०० दलघमी पाणी गायब झाले आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे ही मोठी घट झाली असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील साठाही ३० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मान्सून लांबणीवर पडल्यास विभागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.(Marathwada Dam Water Level)

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या महिन्याभरापासून सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत असून तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. (Marathwada Dam Water Level)

या भीषण उष्णतेचा थेट परिणाम आता जलसाठ्यावर होऊ लागला आहे. वाढते बाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतील जलसाठा अवघ्या आठ दिवसांत तब्बल २०० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) घटला आहे.(Marathwada Dam Water Level)

बाष्पीभवन आणि मागणीचा दुहेरी फटका

गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमानाने ४३ अंशांची पातळी गाठल्याने धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. 

त्यातच उन्हाळ्यामुळे शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत पिण्याच्या पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, मागील आठवड्यात २६३४ दलघमी असलेला साठा आता २४०० दलघमीपर्यंत खाली आला आहे.

प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचा सविस्तर तपशील

मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांची स्थिती पाहता, चिंतेचे ढग गडद होताना दिसत आहेत. विभागात मोठ्या प्रकल्पांशिवाय मध्यम आणि लघु प्रकल्पांची अवस्थाही खालावली आहे.

प्रकल्पाचा प्रकारएकूण संख्याआजचा सरासरी जलसाठा (%)
मोठी धरणे११४६%
मध्यम धरणे७५३३%
लघु प्रकल्प७५८२५%
उच्च पातळी बंधारे३५(सातत्याने घट)

'एल निनो'चे सावट आणि प्रशासनाची चिंता

पावसाळा सुरू होण्यास अवघा एक महिना शिल्लक आहे. मात्र, यंदा 'एल निनो' प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ११ मोठ्या धरणांत ४२२७ दलघमी साठा उपलब्ध होता, परंतु आता तो झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

जलसंपदा विभागाचे आवाहन

उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी असले तरी सिंचनापेक्षा पिण्यासाठी अधिक पाण्याची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा विभागाने जनतेला उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. पुढील महिनाभर पाण्याची ओढ कायम राहण्याची शक्यता असल्याने पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : सावधान! १५ मेपर्यंत तापमान आणखी वाढणार, IMD चा मोठा इशारा

अधिक वाचा : Soil Health Card : जमिनीचा 'हेल्थ रिपोर्ट' तयार; आता जमीनच सांगणार किती खत वापरायचं

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Faces Water Crisis: Dam Levels Drop Dangerously Low

Web Summary : Marathwada faces a severe water crisis due to intense heat and increased demand. Water levels in 11 major dams have significantly decreased, prompting concerns and appeals for water conservation as reserves dwindle rapidly.
टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीजायकवाडी धरणमराठवाडा