Join us

Marathwada Crop Crisis : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा तडाखा; नांदेड, लातूर, धाराशिव पिके पाण्यात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:56 IST

Marathwada Crop Crisis : मराठवाड्यावर पुन्हा काळे ढग जमले आहेत. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील १० मंडळांत बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम आणखी संकटात सापडला आहे. पिकांच्या नुकसानीत मोठी भर पडली असून पंचनाम्यांचा वेग मंदावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Marathwada Crop Crisis)

Marathwada Crop Crisis : मराठवाड्यात खरीप हंगामावर संकट गडद होत आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. एकूण १० महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून नुकसानीचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Marathwada Crop Crisis)

३ जिल्ह्यांत अतिवृष्टी

नांदेड : ९ मंडळांमध्ये जोरदार पाऊस; वार्षिक सरासरीच्या १००% पावसाची नोंद.

लातूर : एका मंडळात अतिवृष्टी.

धाराशिव : एका मंडळात पावसाचा तडाखा.

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्याने खरीप पिकांना मोठे नुकसान झाले आहे.

पावसाचा आकडा

नांदेड जिल्ह्यात वार्षिक सरासरी पाऊस ६७९ मि.मी., तर आतापर्यंत ६१५ मि.मी. पावसाची नोंद म्हणजे ९०% हंगामी पाऊस.

नांदेडमध्ये १००%, हिंगोलीत ९७%, जालन्यात ९६% पावसाची नोंद झाली.

पिकांच्या नुकसानीचे चित्र

खरीप हंगामात सुमारे १६,१४,४३३ शेतकऱ्यांची पिके हातून गेली.

नुकसानीच्या पंचनाम्यात १ लाख नवीन शेतकऱ्यांची भर पडली आहे.

मागील दहा दिवसांतच मराठवाड्यात नुकसानीत १ लाख हेक्टरची भर झाली.

पिकांचा प्रकारनुकसानग्रस्त क्षेत्र (हे.)
जिरायत पिके१२,७१,८४५
बागायत२,९५१ 
फळपीक६,८९९
एकूण१२,८१,६९५ 

पंचनाम्यांचा वेग कमी

गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ६४% पंचनामे पूर्ण झाले आहेत.

मागील आठवड्यात पंचनाम्यांचा टक्का ५०% होता, मात्र दहा दिवसांत फक्त १४% काम झाले.

जालना जिल्ह्यातील १८४ गावांतील २७,६५९ शेतकऱ्यांच्या १७,४६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, परंतु तेथील पंचनामे सुरू झालेले नाहीत.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना हे जिल्हे पंचनाम्यात मागे आहेत.

मानवी व प्राण्यांचे नुकसान

मागील तीन महिन्यांत ५२ जणांचा मृत्यू (वीज पडून किंवा पुरात वाहून) झाला, तर ४ जण जखमी झाले. तसेच १ हजार ६७ जनावरे दगावली आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान वाढत आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत प्रशासनाने त्वरित पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Satbara Utara Correction : शेतकऱ्यांना दिलासा: महसूल विभाग गावातच करणार सातबारा दुरुस्ती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडाशेतकरीशेतीपीकपाऊसखरीप