Join us

Manjara Dam Water Storage : मांजरा धरण फुल्ल; सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:25 IST

Manjara Dam Water Storage : पावसाने दमदार हजेरी लावताच मांजरा धरणातून तब्बल ५२४१ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मांजरा प्रकल्प गच्च भरला आहे. वाचा सविस्तर (Manjara Dam Water Storage)

Manjara Dam Water Storage :  पावसाने दमदार हजेरी लावताच मांजरा धरणातून तब्बल ५२४१ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मांजरा प्रकल्प गच्च भरला आहे.  (Manjara Dam Water Storage)

सहा दरवाजांतून सुरू झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईसह सिंचनाचा मोठा प्रश्न मिटणार आहे. (Manjara Dam Water Storage)

मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. वाढत्या पाणलोटामुळे धरणाचे सहा दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून तब्बल ५२४१.४२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. (Manjara Dam Water Storage)

शनिवारी दुपारी दोन वाजता प्रथम चार दरवाजे उघडण्यात आले होते, तर सोमवारी दुपारी आणखी दोन दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले असून मांजरा नदी उगमस्थानापासून संगमापर्यंत दुथडी भरून वाहत आहे.

पाण्याचा प्रवास कर्नाटकापर्यंत

धरणातून सोडण्यात आलेले पाणी नदीपात्रातून ९० किमी प्रवास करून होसूर बॅरेजेसमार्गे कर्नाटकात पोहोचले आहे. आतापर्यंत २४.२६ दलघमी पाणी कर्नाटकात गेले असल्याची माहिती अभियंता सूरज निकम यांनी दिली.

बळीराजाचा आनंद दुणावला

मांजरा नदीच्या काठावरील शेती क्षेत्राला या पाण्याचा मोठा लाभ झाला असून, शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. परतीच्या पावसात पूर येणारी ही नदी यंदा ऑगस्ट महिन्यातच दुथडी भरून वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे.

पाणी प्रश्न मार्गी

अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब, लातूर शहरासह २४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणातून केला जातो. धरण ऑगस्टमध्येच पूर्ण भरल्याने शहरवासीयांच्या पाणीटंचाईची भीती दूर झाली आहे.

लातूर जिल्ह्याला सर्वाधिक लाभ

या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे लातूर जिल्ह्याला सर्वाधिक फायदा होतो. बीड व धाराशिव जिल्ह्यातही लाभक्षेत्र आहे, परंतु ते तुलनेने कमी आहे.लासरा, बोरगाव, अंजनपूर, वांजरखेडा, वांगदरी, कारसा, पोहरेगाव, नागझरी, खुलगापूर, शिवणी, घरणी, बिदगीहाळ, डोंगरगाव, होसूर व भुसनी ही बॅरेजेस भरणार असल्याने नदीकाठच्या गावांत आनंदाचे वातावरण आहे.

हे ही वाचा सविस्तर : Manjara Dam Water Storage : मांजरा धरण ९० टक्के भरले; चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना अलर्ट!

टॅग्स :शेती क्षेत्रमांजरा धरणधरणपाणीबीडलातूरपाऊस