Join us

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण अन् थंडीला विराम, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:29 IST

Maharashtra Weather Update : विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (Light Rain) दि.१४ ते १७ नोव्हेंबर ला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून....

Maharashtra Weather Update :  विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दि.१४ ते १७ नोव्हेंबर ला (गुरुवार- शनिवारी) तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची (Light Rain) शक्यता जाणवते.             उद्यापासून म्हणजेच १४ नोव्हेंबरपासून ते १७ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) राहील. या निरभ्र आकाशामुळे सध्या सकाळ-संध्याकाळी काहीशा वाढत्या थंडीला, फक्त या तीन दिवसासाठी विराम मिळेल, असे वाटते. जाणवणारा हा वातावरणीय परिणाम विशेषकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातच (Maharashtra Weather Update) अधिक जाणवेल. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक या जिल्ह्यात हा परिणाम जाणवणार नाही. 

रविवार दि. १७ नोव्हेंबरपासून पुन्हा थंडीसाठी स्थिती पूर्ववत होईल, असे वाटते. पुढील आठवडाभर महाराष्ट्रात दुपारचे कमाल व पहाटेचे किमान असे दोन्हीही तापमाने हे सरासरीइतके राहून कमाल तापमान हे ३१ तर किमान तापमान हे १५ ते १७ डिग्री सेंटीग्रेड च्या दरम्यान राहील. पुढील आठवडाभर म्हणजे २० नोव्हेंबरपर्यन्त चक्रीवादळ साठीची कोणत्याही वातावरणीय प्रक्रियेची शक्यता नाही. 

- माणिकराव खुळे.Meteorologist (Retd)IMD Pune.         

टॅग्स :हवामानपाऊसशेती क्षेत्रमहाराष्ट्र