Maharashtra Weather Update : आज व उद्या रविवार व सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमान (Temperature) हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे. ही तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून महाराष्ट्रातील काही थंडीच्या लाटेची (Cold Weather) शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे जोरदार कमबॅक (Mercury) झाले असून पुढील काही दिवस गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळणार आहे. यात महाराष्ट्रातील जळगांव, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, या सर्व जिल्ह्यात या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते.
सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता ही कायम आहेच. खान्देशांतील नंदुरबार, धुळे जळगांव अशा तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune