Maharashtra Weather Update : काल गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत असलेल्या ऊबदार वातावरणात बदल होवून, आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. ९ जानेवारीपर्यंत किमान तापमानात काहीशी घट होवून संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू मध्यम थंडी (Cold Weather) जाणवेल असे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.
त्यापुढील म्हणजे १० ते १६ जानेवारी दरम्यानच्या दुसऱ्या आठवड्यातही खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा तसेच रत्नागिरी, छ.संभाजीनगर ९ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव (Maharashtra Weather Update) तसाच टिकून राहून पहाटेचे किमान तापमान हे सरासरीच्या खाली जाणवेल असे वाटते. त्यातही उत्तर विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.
परंतुवर स्पष्टीत ९ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच म्हणजे १२ ते १४ डिग्री से. ग्रेड इतके जाणवण्याची शक्यता आहे, असे वाटते. पुढील १५ दिवस म्हणजे गुरुवार दि. १६ जानेवारीपर्यन्त महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. त्यानंतर मात्र थंडी वा पावसाची स्थिती ही मात्र एमजेओच्या तीव्रतेवरच अवलंबून असेल, असे वाटते.
- माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.),
IMD Pune.