Maharashtra Weather Update : आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. १० जानेवारीपर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात (Cold Weather) जाणवेल. आज मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली जाणवले असुन मुंबई सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीच्या २ डिग्री खालावून १५.२ डीसे. ग्रेड होते.
शनिवार दि.११ जानेवारीपासून मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात (Temperature Down) पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे .
तीन दिवसानंतर, कशामुळे थंडी कमी होणार?
महाराष्ट्रावर हलके हवेचे उच्चं दाब क्षेत्रही तयार झालेले आहे. त्यामुळे घड्याळ काटा फिरतो, त्या दिशेप्रमाणे हवेच्या उच्चंदाब क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून बाहेर फेकल्याप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचे (अँटीसायक्लोनिक विंड) क्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार वहन होत असते.
उत्तर-अर्धभारतात अगोदरच मार्गस्थ होवून गेलेल्या पश्चिमी झंजावातातून तेथे पाऊस, होत आहे. नवीन प. झंजावाताही तेथे येण्याच्या तयारीत आहे. तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वारे वाहत आहे. त्यामुळे एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून ३ दिवस कायम आहे.
परंतु शनिवार दि.११ जानेवारी पासून पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे बं.उपसागराततून ही वारे रहाटगाडगे पद्धतीने पाणी उचलावे तशी आर्द्रता महाराष्ट्रावर येण्याच्या शक्यत्यामुळे काहीसे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात जाणवेल. त्यामुळे शनिवार दि.११ जानेवारी पासून पुन्हा थंडीचा प्रभाव कमी होईल.
- माणिकराव खुळे
Meteorologist ( Retd)
IMD Pune