Maharashtra Rain : शुक्रवार दि. ८ ऑगस्ट, रक्षाबंधन (नारळी पौर्णिमे) पासुन संपूर्ण विदर्भ व कोकणात संपूर्ण दुसरा आठवडा (८ ते १५ ऑगस्ट) ला तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस (८ व ९ ऑगस्ट) ला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मराठवाड्यात मात्र आजपासूनच पुढील ३ दिवस (६, ७, ८ ऑगस्ट, बुधवार ते शुक्रवार) ला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः खालील जिल्ह्यात ह्या पावसाची शक्यता ही अधिक जाणवते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तापमानातील वाढ - संपूर्ण विदर्भ, जळगांव, छ.सं.नगर जिल्हे, नाशिक व पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग अशा १५ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने वाढ होवून तापमान ३२ ते ३३ डिग्री दरम्यान जाणवत आहे.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.